.jpg)
एस अॅड पी डाऊ जोन्सच्या आकडेवारीनुसार, सोमवारी अॅपल कंपनीचे शेअर ६६५.१५ अब्ज अमेरिकन डॉलरच्या पातळीवर बंद झाले होते. याचबरोबर अॅपलने एकूण बाजाराच्या भांडवलात ६२३.५ अब्ज अमेरिकन डॉलरचे आकडा पार केला. हा आकडा १९९९मध्ये मायक्रोसॉफ्टने ६२०.८ अब्ज अमेरिकन डॉलरपेक्षा अधिक आहे. याआधी अॅपल कंपनीने मागच्या वर्षी मोस्ट व्हॅल्यूबल हा किताब मिळवला होता.
शेअर बाजारातील तज्ज्ञांनी सांगितले की, कंपनीच्या शेअरचे भाव येत्या काही दिवसांत आणखी वाढतील. ३८ स्टॉक विश्लेषकांनी अॅपल कंपनीच्या भाग भांडवलामध्ये ७४५.८० अब्ज डॉलर एवढी वाढ होईल, असे सांगितले आहे. अॅपलनंतर जगातील सगळ्यात मोठ्या भागभांडवलाची कंपनी एक्सन मोबिल कॉर्प आहे.
सौजन्य : 
अॅपल ठरली जगातील सगळ्यात मोठी भागभांडवलाची कंपनी
Reviewed by Sooraj Bagal
on
September 03, 2012
Rating:
.jpg)
No comments: