सोनीचा नवीन एक्सपिरिया मायरो !

काही दिवसांपूर्वीच सोनीने भारतीय बाजारात आणखी एक स्मार्टफोन आणला आहे. एक्सपिरिया मायरो असे त्याचे नाव आहे. या फोनची किंमत आहे 14 हजार 499 रुपये.
माझ्याकडेसुद्धा सोनीचाच मोबाइल आहे. आवाज, टच, कॅमेरा सर्व बाबतीत खरच बेस्ट असतात सोनी उत्पादने.  

सोनीचा हा फोन अँड्रॉइड 4.0 आइस क्रीम ऑपरेटिंग सिस्टिमवर चालतो. त्यात 800 मेगाहर्ट्झचा प्रोसेसर बसवण्यात आला आहे. फोनचा डिस्प्ले 3.5 इंचांचा आहे. त्याचे रेझोल्युशन 320 x 480 आहे. मायरोची इंटर्नल मेमरी 4 जीबी असून, ती 32 जीबीपर्यंत वाढवता येते. या फोनची रॅम 512 एमबी आहे. एक्सपिरिया मायरोमध्ये एक फ्रंट फेसिंग कॅमेरादेखील आहे. फोनचा 5 मेगापिक्सल ऑटोफोकस कॅमेरा एलइडी फ्लॅशसह 2592 x 1944 पिक्सलची छायाचित्रे टिपतो. वायफाय, वायफाय हॉटस्पॉट, ब्लूटूथ, यूएसबी टेथरिंग, डीएलएनए सर्टिफाइड हे या फोनचे इतर फीचर्स आहेत.


सोनीचे इतर मोबाइलसुद्धा अत्यंत आकर्षक असून तुम्ही तेसुद्धा विकत घेऊन इम्प्रेशनच्या फंदात पडू शकता!!!!!!!!.     


                                                                            
सोनीचा नवीन एक्सपिरिया मायरो ! सोनीचा नवीन एक्सपिरिया मायरो ! Reviewed by Sooraj Bagal on September 20, 2012 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.