ओळखा अनोळखी नंबर : ट्रू कॉलर अ‍ॅप्लिकेशनद्वारे



मिस्ड् कॉल किंवा अनोळखी क्रमांक मोबाइल यूजर्सना त्रासदायक ठरतात. पण अशा क्रमांकावरून वारंवार मिस कॉल येत गेले तर तो व्यक्ती परेशान होणे स्वाभाविक आहे. अशा समस्या महिलांना जास्त त्रासदायक ठरतात. अशा कॉलर्सना शोधण्यासाठी टू कॉलर (True Caller) नावाचे एक अ‍ॅप्लिकेशन स्विडनच्या कंपनीने बनवले आहे, याने मोबाइल किंवा लॅण्डलाईन वरून आलेल्या फोन क्रमांकाच्या मालकाचा सहजपणे शोध लागू शकतो. या कंपनीकडे भारतातील 5 ते 8 कोटी लोकांचे फोन नंबर्स जमा आहेत.


अ‍ॅप्लिकेशन असे वापरावे : नेटवरून हे अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड करून घेता येते. जेव्हा एखादा यूजर हे अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड करून घेतो, तेव्हा इनहॅन्स नावाचे एक फंक्शन चालू होते. तुमच्या फोन बुक मधील सर्व कॉन्टक्ट्स आम्ही सर्व्हरवर सुरक्षित ठेवत आहोत. अर्थात यासाठी यूजरची परवानगी आधी घ्यावी लागते. यात तुमचे क्रमांक डाटा सर्व्हरमध्ये सार्वजनिकरित्या शोधता येतील अशा पद्धतीने वापरात आलेले असतात. त्यामुळे तुम्हाला आलेल्या अनोळखी क्रमांकाचा शोध अशा डाटाबेसमधून घेतला जाऊ शकतो. 
भारतात या अ‍ॅप्लिकेशनचे आतापर्यंत लाखो यूजर्स झालेले आहेत.





सौजन्य : 
ओळखा अनोळखी नंबर : ट्रू कॉलर अ‍ॅप्लिकेशनद्वारे ओळखा अनोळखी नंबर : ट्रू कॉलर अ‍ॅप्लिकेशनद्वारे  Reviewed by Sooraj Bagal on September 09, 2012 Rating: 5

1 comment:

Powered by Blogger.