सॅमसंग गॅलक्सी एस-३ ची आयफोनपेक्षा अधिक विक्री : २० दशलक्षांवर मोबाईल विकले











 सॅमसंग गॅलक्सी एस-३                                                                                        आयफोन-४ एस 

न्युयॉर्क - स्मार्टफोनच्या मार्केटमध्ये मोठी उलथा-पालथ सुरु आहे. अमेरिकेत पहिल्यांदाच सॅमसंगचा गॅलक्सी एस-३ अ‍ॅपलच्या आयफोन-४ ला भारी पडला आहे. आयफोन-४ गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये बाजारात आला, तेव्हापासून अमेरिकेच्या मार्केटमध्ये त्याचा बोलबाला होता. मात्र, ऑगस्टमध्ये बाजी मारली ती गॅलक्सी एस-३ ने. २० दशलक्षांपेक्षा अधिक गॅलक्सी एस-३   विकले गेले आहेत. 

नुकतेच सॅमसंगला पेटंट केसमध्ये अ‍ॅपलकडून मोठा झटका बसला आहे. त्यानंतर आलेली ही बातमी सॅमसंगसाठी आशादायीच म्हणावी लागेल. मात्र, टेक्नॉलीजी संबंधीत वेबसाईट सीनेटनुसार आयफोन-४ ऑक्टोबरपासून बाजारात आहे त्यामुळे त्याच्या विक्रीत थोड्या प्रमाणात घट झाली आहे. आयफोनचे नवे व्हर्जन  सप्टेंबर महिन्यात लॉन्च होत आहे. त्यानंतर सॅमसंगचा क्रम पुन्हा खाली येणार हे निश्चित आहे. 

तसेच स्मार्टफोनचे मार्केट आणखी गरम होण्याची शक्यता आहे. ब-याच दिवासांपासून मागे पडलेली नोकिया त्यांचा अनेक सुविधांनी युक्त असलेला स्मार्टफोन बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. त्यासोबतच इतरही अनेक कंपन्या आपली उत्पादने बाजारात आणण्यासाठी सज्ज आहेत.  



सौजन्य:  
सॅमसंग गॅलक्सी एस-३ ची आयफोनपेक्षा अधिक विक्री : २० दशलक्षांवर मोबाईल विकले सॅमसंग गॅलक्सी एस-३ ची आयफोनपेक्षा अधिक विक्री : २० दशलक्षांवर मोबाईल विकले Reviewed by Sooraj Bagal on September 08, 2012 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.