काम करण्यासाठी तुम्हाला वेगवान आणि वजनाने हलक्या लॅपटॉपची गरज असेल तर इन्स्टंट अल्ट्राबुक विकत घ्या. तो आता प्रतिष्ठेचे प्रतीक बनू पाहात आहे. जास्त किंमत आणि कमी बॅटरी बॅकअपमुळे लॅपटॉपच्या या रेंजकडे पूर्वी फारसे कोणी वळत नव्हते. जगातील बड्या संगणक कंपन्या अल्ट्राबुकची फीचर्स अँपल मॅकबुकप्रमाणेच उत्कृष्ट करण्याच्या प्रयत्नात आहेत.
स्क्रीन : अल्ट्राबुकच्या या अद्ययावत व्हर्जनमध्ये अँपलप्रमाणे उत्तम फीचर्स आहेत. याचे डिझाइनही आकर्षक आहे. याचा आकार लहान असला तरी 11 इंची व 15 इंची मॉडेलमध्ये बराच फरक आहे. तुम्हाला मोठी स्क्रीन हवी असेल तर जाड फ्रेमची निवड करा. डिस्प्ले खराब असेल तर लॅपटॉप स्वस्तातही मिळू शकतो. पण पिक्चर क्वालिटीच फॅशन स्टेटमेंट आणि उपयुक्त मशीनला वेगळी ओळख मिळवून देते.
बॅटरी बॅकअप : वजनाला खूपच हलक्या लॅपटॉपचा बॅटरी बॅकअप कमी असे. त्यामुळे दर अर्ध्या तासाला लॅपटॉप चार्ज करावा लागत असे. पण आता यात सॉलिड स्टेट ड्रायव्हर्स (एसएसडी) चा वापर करण्यात आलेला आहे. त्यामुळे लॅपटॉपला सुरू होण्यास कमी वेळ लागतो. वीजही वाचते. याच यंत्रणेमुळे अल्ट्राबुक महाग आहेत. एसएसडी हे हार्ड ड्राइव्ह आहेच. यामध्ये फ्लॅशच्या साहाय्याने डाटा स्टोअर केला जातो. हे अत्यंत वेगाने काम करते. अल्ट्राबुकमध्ये कॅशे ड्राइव्ह या आकाराने छोट्या असलेल्या एसएसडीचा वापरही करण्यात आला आहे. यामध्ये दैनंदिन कामाच्या फाइल ठेवता येतात.
प्रोसेसर : या लॅपटॉपमध्ये इंटेल कोर आय 5 /आय 7 प्रोसेसर असे दोन प्रकार उपलब्ध आहेत. या दोन्ही प्रोसेसरच्या कार्यशैलीतही बराच फरक आहे. अल्ट्राबुकमध्ये इंटेल ग्राफिक्स 3000 प्रोसेसर आहे. हा सीपीयूशी जोडला जातो. व्हिडिओ पाहण्यासाठी याचा वापर केला जातो. पण गेम्स खेळताना थोड्या अडचणी येतात. स्टफ मासिकाने बाजारात उपलब्ध असलेल्या तीन नामांकित ब्रँडच्या अल्ट्राबुकची चाचणी घेतली आणि प्रत्येक ब्रँडचे वैशिष्ट्य जाणून घेतले.
DELL XPS-13; (+) बॅटरी बॅकअप उत्तम, सुंदर डिझाइन, आकर्षक लूक, सॉलिड बिल्ड क्वालिटी (-) वजनदार, स्क्रीन क्वालिटी कमी, किंमत जास्त किंमत- 99,990/-
HP ENVY-14 SPECTRE (+) ग्लास डिझाइन, उत्तम स्क्रीन, साउंड क्वालिटी व कनेक्टिव्हिटी सर्वोत्तम (-) आकार, वजन आणि किंमत जास्त किंमत- 99,999
TOSHIBA PORTIGEE Z-830 (+) वजन कमी, कनेक्टिव्हिटी उत्तम (-) स्क्रीन क्वालिटी खराब, किंमत अधिक, डिझायनिंग खास नाही, ट्रॅकपॅडमध्ये अडचणी किंमत- 96,250

ULTRABOOK: स्लिम, लाइट आणि पॉवरुफुल
Reviewed by Sooraj Bagal
on
September 24, 2012
Rating:
No comments: