आयफोन ५ साठी अॅपल कंपनीने तयार केलेल्या अॅपल मॅप्सया अॅप्लीकेशनमध्ये माटुंगा स्टेशनची नोंद अरबी समुद्रात झाली आहे . मुंबईची शान असणारा वांद्रे वरळी सागरी सेतूया अॅपमध्ये अस्तित्वातच नाही . सर्वाधिक आधुनिक म्हणून ओळखल्या जाणा- या या अॅपल मॅप्समध्ये मुंबईतील अनेक रेल्वे स्टेशनची नोंद झालेली नाही . काही स्टेशन तर मूळ जागेपेक्षा खूप दूर असल्याचे दाखवण्यात आले आहे . अॅपलच्या ऑपरेटिंग सिस्टिममध्येही ( आयओएस सहा ) अनेक दोष आढळले आहेत .
आयफोन ५ हा स्टिव्ह जॉब्ज यांच्या मृत्यूनंतर अॅपलने तयार केलेला पहिला स्मार्ट फोन आहे . या फोनच्या सॉफ्टवेअरसाठी जॉब्ज यांचे मार्गदर्शन मिळालेले नाही . त्याचा फटका आयफोन ५ ला बसल्याची शक्यता व्यक्तहोत आहे .
अॅपल मॅप्स : आयफोन 5 मध्ये दोष
Reviewed by Sooraj Bagal
on
October 10, 2012
Rating:
No comments: