मायक्रोसॉफ्टने विंडोज ८ लॉँच करण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे. एक्सपी युझर्सला नवीन इंटरनेट एक्स्प्लोअरर देणे बंद केल्यानंतर कंपनीने आता एमएसएनचे नवीन रूप सादर करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. एमएसएनच्या नव्या वेबसाइटलाही विंडोज ८ चा लूक आणि अनुभव असणार आहे. येत्या महिनाअखेर हा लूक सादर होणार आहे. त्यातही प्रामुख्याने 'टच' अँड 'युझ' वापर केला जाण्याची दाट शक्यता आहे.
www.msn.com
विंडोज ८ आणि इंटरनेट एक्सप्लोअरर १० मुळे कम्प्युटर आणि इंटरनेट वापरण्याचा अनुभव मोठ्या प्रमाणात बदलणार आहे. त्यामुळेच आम्हाला एमएसएनसह इतर सुविधांबाबत नव्याने विचार करावा लागल्याचे कंपनीने जनरल मॅनेजर बॉब विसे यांनी सांगितले. विंडोज ८ आणि इंटरनेट एक्सप्लोअरर१० मुळे यापूर्वी शक्य नसलेल्या अनेक गोष्टी शक्य झालेल्या आहेत. सध्याच्या टॅबलेट आणि टचच्या जगात अनेक व्याख्या बदलत असल्याचे ध्यानात घेऊन हे बदल करण्यात येत आहेत. त्यामुळे इंटरनेट युझर्सला लवकरच अनपेक्षित आणि सुंदर असे काहीतरी पहायला मिळेल असे ते म्हणाले.
टॅबलेट किंवा स्मार्टफोनमध्ये असणा-या आयकॉनिक लूक प्रमाणे एमएसएनचा नवा लूक असेल अशी शक्यता तज्ञ वर्तवत आहेत. टच हे फीचर ध्यानात घेऊन हे बदल करण्यात येत असल्याने यात वापरण्यात येणारे आयकॉन मोठे असणार आहेत. एमएसएनचा लूक बदलताना त्यातील सर्वच गोष्टी बदलण्यात येणार असून हेडलाइन, फोटो, व्हिडीओ यासर्वच गोष्टीत नवीन काहीतरी असणार आहे. यामध्ये एखाद्या बातमीवरून तिच्या मूळ स्रोतावर जातानाही व्हिज्युअली फारसे बदल होणार नसून बातमीच्या महत्त्वाप्रमाणे तिचा आकार असणार असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदाच साइटवरील सर्वच विभागांचा लूक सारखा ठेवण्यासाठी कंपनीकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. सध्या एमएसएनवर रॉयटर्स, असोसिएटेड प्रेस आणि एनबीसीवरून बातम्या घेतल्या जातात. पण नव्या लूकमध्ये एमएसएन स्वतःही काही बातम्या देणार आहे. या आठवड्यात न्यूयॉर्क अॅव्हटायझिंग वीकमध्ये नव्या साइटचे प्रदर्शन केले जाणार आहे. सर्वसामान्य युझर्सना जवळपास २६ ऑक्टोबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे. मात्र विंडोज ८ आणि एक्सप्लोअरर १० च्या युझर्सनाच या नव्या लूकचा आस्वाद घेता येणार असून इतर ऑपरेटींग सिस्टीम आणि ब्राऊझर वापरणाऱ्यांना मात्र सध्याचीच वेबसाइट दिसणार आहे.
एमएसएनच्या वेबसाइटला सध्या ४८ कोटींहून अधिक युझर्स दर महिन्याला भेट देतात आणि याहू आणि एओएलप्रमाणे ती एक लोकप्रिय वेबसाइट आहे. जगभरातील २७ बाजारपेठांमध्ये ती सर्वाधिक पाहिली जाणारी वेबसाइट आहे.

एमएसएन लूक बदलणार
Reviewed by Sooraj Bagal
on
October 09, 2012
Rating:
No comments: