स्मार्टफोनधारकांची संख्या पोहोचली एक अब्जावर









वॉशिंग्टन - जगभरातील स्मार्टफोन युजर्सचा आकडा एक अब्जाच्याही पार गेला आहे. अमेरिकेतील संशोधन आणि सल्लागार संस्था ‘स्ट्रॅटेजी अ‍ॅनालिस्ट्स’च्या अहवालात याबाबत माहिती देण्यात आली आहे. मोबाइल क्षेत्राच्या विकासात अ‍ॅपलचे अत्यंत मोलाचे योगदान असल्याचे अहवालात म्हटले आहे. 
अहवालानुसार, 2012 वर्षाच्या तिसर्‍या तिमाहीत स्मार्टफोनचा वापर करणार्‍यांची संख्या 1.03 अब्जांवर पोहोचली आहे. ‘स्ट्रॅटेजी अ‍ॅनालिस्ट्स’चे अधिकारी स्कॉट बिचेनो यांनी सांगितले की, अब्जावधीचा आकडा गाठण्यासाठी स्मार्टफोन क्षेत्राला 16 वर्षे लागली आहेत. म्हणजेच सातपैकी एका जणाजवळ स्मार्टफोन येण्यासाठी सोळा वर्षांचा कालावधी जावा लागला. पुढील एक अब्जाचा आकडा 2015 मध्येच पार होईल, अशी आम्हाला आशा असल्याचे ते म्हणाले. नोकिया कम्युनिकेटर हा जगातील पहिला आधुनिक स्मार्टफोन होता. 1996 मध्येच तो बाजारात सादर करण्यात आला होता. मात्र 21 सप्टेंबर 2007 मध्ये अ‍ॅपलने आपला पहिला आयफोन सादर केला तेव्हा स्मार्टफोन बाजाराचे रुपडेच पालटले.
बाजारात अमर्यादित संधी
जगभरातील बहुतांशी लोकांकडे आजही स्मार्टफोन नाही. यामुळे या क्षेत्राच्या विकासाच्या अनंत शक्यता आहेत. विशेषकरून भारत, चीन आणि आफ्रिकेतील देशांसारख्या उगवत्या बाजारांत.  
स्कॉट बिचेनो, स्ट्रॅटेजी अ‍ॅनालिस्ट्स.
स्मार्टफोनधारकांची संख्या पोहोचली एक अब्जावर स्मार्टफोनधारकांची संख्या पोहोचली एक अब्जावर Reviewed by Sooraj Bagal on October 26, 2012 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.