अ‍ॅपल आयपॅड मिनी लॉंच ! किंमती सुमारे १७ हजार रुपये


PIX: अ‍ॅपल आयपॅड मिनी लॉंच !
iPad.jpg








सप्टेंबर महिन्यात आय फोन फाइव्ह लॉन्च करताना आपण लवकरच मिनी ऑयपॅड घेऊन येणार असल्याची खुशखबर अॅपलनं टेक सॅव्ही तरुणांना दिली होती आपला हा शब्द त्यांनी पाळला असून मिनी आयपॅडचं दर्शन जगाला घडवले

नव्या मिनी आयपॅडची स्क्रीन फक्त ७ ९ इंचांची आहे याआधीच्या आयपॅडची स्क्रीन दहा इंचांची होती ए प्रोसेसर पाच मेगापिक्सल कॅमेरा एचडी व्हिडिओ चॅट ही नव्या मिनी आयपॅडची वैशिष्ट्ये आहेत 

नव्या मिनी आयपॅडचे वाय फाय मॉडेल ३२९ डॉलर (सुमारे १७ हजार ६७८ रुपये किंमतीचे आहे तर थ्री जी मॉडेलची किमान किंमत ४५९ डॉलर 
सुमारे २५हजार २०० रुपये  आहे अॅपलच्या नव्या आयपॅडसाठी २६ ऑक्टोबरपासून बुकिंग सुरू होत आहे . 

नवा मिनी आयपॅड टॅबलेट गूगलच्या नेक्सस ७ टॅबलेटपेक्षा जास्त उत्तम आहे असे अॅपल कंपनीने सांगितले .कंपनीने मिनी आयपॅड टॅबलेट व्यतिरिक्त १३ इंची स्क्रीन आणि ० ७५ इंची जाडीचे मॅकबुक प्रो देखिल लाँच केलेहे आतापर्यंतचे वजनाने सर्वात हलके मॅकबुक प्रो आहे 


PIX: अ‍ॅपल आयपॅड मिनी लॉंच !
 अ‍ॅपलने मंगळवारी रात्री उशिरा सॅन जोन्‍स येथे बहुप्रतिक्षित आयपॅड मिनी लॉंच केले. यावेळी अ‍ॅपलचे वरिष्‍ठ उपाध्‍यक्ष फिलिप शिलर यांनी नव्‍या आयपॅड मिनीच्‍या खास फिचर्सची माहिती दिली. येत्‍या 2 नोव्‍हेंबरपासून आयपॅड मिनी बाजारात विक्रीसाठी उपलब्‍ध होईल. मात्र, तो भारतात कधी मिळेल याचा उलगडा अद्याप करण्‍यात आलेला नाही.

PIX: अ‍ॅपल आयपॅड मिनी लॉंच !
स्‍क्रीन/डिस्‍प्‍ले- काळ्या आणि पांढ-या रंगाचे मॉडेल (ब्‍लॅक अँड व्‍हाईट), 7.9 इंचाची स्‍क्रीन, 1024x768 पिक्‍सल डिस्‍प्‍ले, 4जी कन्‍वर्टिबल.

आकार- 7.2 मिमी जाडी, आयपॅडपेक्षा 23% कमी जाडीचा, 308 ग्रॅम वजन, आयपॅडपेक्षा 53% हलका.

अ‍ॅप्‍स- 2.75 लाख अ‍ॅप्लिकेशन, फोटोंना एडिटिंग आणि शेअरिंग करणे सोपे, 1080 पिक्‍सल एचडी रेकॉर्डिंग करण्‍याची क्षमता.

डुएल कोअर ए5 चिपमुळे एकाचवेळी अनेक कामे करण्‍याची सुविधा, 10 तासांचा बॅटरी बॅकअप.

PIX: अ‍ॅपल आयपॅड मिनी लॉंच !


फेसटाईम आणि आयसाईट कॅमेरा
समोरच्‍या बाजूस फेसटाईम 720 पीएचडी कॅमेरामुळे व्हिडिओ कॉलिंगदरम्‍यान उत्‍कृष्‍ट दर्जाचे चित्रिकरण. त्‍याच्‍या मदतीने रेकॉर्डिंग आणि स्टिल फोटो चांगल्‍या पद्धतीने काढता येऊ शकतो. मागच्‍या बाजूस 1080 पिक्‍सल एचडी आयसाईट कॅमेरा आहे. ऑटोमॅटिक व्हिडिओ स्‍टेबलायजेशनमुळे आयपॅड हलल्‍यानंतरही व्हिडिओमध्‍ये शेक होणार नाही.  5 मेगापिक्‍सलचा स्टिल कॅमेराचीही सुविधा आहे.
नेक्‍स्‍ट जनरेशन मोबाईल कनेक्टिव्हिटी
तुमच्‍याकडे वायफाय नसेल तरीसुद्धा मोबाईल नेटवर्कशी कनेक्‍ट करता येऊ शकते. यासाठी फक्‍त वायफाय/सेल्‍यूलर मॉडेल असण्‍याची गरज आहे. मोबाईल नेटवर्कनेही चांगल्‍या स्‍पीडचे इंटरनेट चालू शकेल.
अ‍ॅडव्‍हान्‍स वायफाय टेक्‍नॉलॉजी
आयपॅड मिनीमध्‍ये वायफायचा वेग जुन्‍या मॉडेलपेक्षा दुप्‍पट आहे. 150 एमबीपीएसच्‍या गतीने डाऊनलोडिंग करता येईल.
आयक्‍लाऊड
हे आयपॅड मिनीमध्‍ये सुरूवातीपासून इन्‍स्‍टॉल करण्‍यात आलेले आहे.


PIX: अ‍ॅपल आयपॅड मिनी लॉंच !
स्‍टोरेज क्षमतेनुसार इतर मॉडेलच्‍या किंमती

16 जीबी (वायफाय)- 329 डॉलर (सुमारे 17437/-रूपये)

16 जीबी (वायफाय/सेल्‍यूलर)- 429 डॉलर (सुमारे 24327/-रूपये)

64 जीबी (वायफाय)- 529 डॉलर (सुमारे 28037/-रूपये)

64 जीबी (वायफाय/सेल्‍यूलर)- 659 डॉलर (सुमारे 34927/- रूपये)



अ‍ॅपल आयपॅड मिनी लॉंच ! किंमती सुमारे १७ हजार रुपये अ‍ॅपल आयपॅड मिनी लॉंच ! किंमती सुमारे १७ हजार  रुपये Reviewed by Sooraj Bagal on October 27, 2012 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.