अनोळखी 'फेसबुकर'ला मेसेजसाठी १ डॉलर!

facebookआपण फेसबुकवर भ्रमंती करत असतो... अचानक आपल्यालाएखादा चेहरा, एखादं प्रोफाइल आवडतं... त्याच्याशी / तिच्याशी मैत्री करावीशी वाटते आणि आपण लगेचच त्यालाफ्रेण्ड रिक्वेस्ट पाठवतो... कधीकधी या रिक्वेस्टसोबतमेसेजही पाठवतो मात्र आता अशा अनोळखी (नॉन-फ्रेण्ड) 'फेसबुकर ला मेसेज पाठवण्यासाठी तुम्हाला एक डॉलर, अर्थात ५० रुपये खर्च करावे लागण्याची शक्यता आहे या संकल्पनेवर फेसबुक प्रायोगिक तत्वावर काम करतंय. 

तुम्हाला एखाद्या अनोळखी व्यक्तीला मेसेज पाठवायचा आहेकिंवा एखादी कंपनी तरुणांना जॉब ऑफर्सबद्दल कळवू इच्छिते, तर त्यांना प्रत्येक मेसेजसाठी एक डॉलर मोजावालागणार आहे त्याबदल्यात, हा मेसेज रिसिव्हरकडे महत्वाच्या मेसेजमध्ये जाईल आणि त्याबद्दल त्याला लगेचच सूचना मिळेल. मेसेजला शुल्क लागू केल्याने स्पॅम मेसेज आणि मेसेजमार्फत पाठवण्यात येणा या व्हायरसलाआळा बसेल, अशी आशा कंपनीने व्यक्त केली आहे 

सध्या फेसबुकमध्ये अदर्स नावाने असणा या मेसेज फोल्डरमध्ये कमी महत्त्वाचे मेसेज येतात नॉट व्हाइट स्पॅमया पर्यायामुळे सोशल नेटवर्किंगमध्ये अनोळखी लोकांनी पाठवलेले मेसेजेस साठवता येतात. हे फोल्डर उपलब्धअसूनही अनेकांना या फोल्डर्सबद्दल माहिती नसते किंवा ते या सेटिंगकडे दुर्लक्ष करतात 

ऑक्टोबर महिन्यापासून फेसबुकने पेड पोस्टची सेवा सुरू केली आहे त्यामुळे तुमची पोस्ट लोकांना लवकर ,स्पष्टपणे आणि अधिक काळ दिसते अनेक युझर्स ७ डॉलर देऊन पेड पोस्टमार्फत जाहिरातदारांप्रमाणे जास्तवेळफेसबुक अपडेट्समध्ये आपली पोस्ट ठेवत असल्याने त्यांनाही फायदा होत आहे .

अनोळखी 'फेसबुकर'ला मेसेजसाठी १ डॉलर! अनोळखी 'फेसबुकर'ला मेसेजसाठी १ डॉलर! Reviewed by Sooraj Bagal on December 26, 2012 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.