1 कोटी गॅलेक्सी मोबाइलची विक्री

कोरियाची इलेक्ट्रॉनिक्स कंपनी सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सने भारतात आपल्या ‘गॅलेक्सी’ मालिकेतील स्मार्टफोन आणि टॅब्लेटच्या विक्रीत तब्बल एक कोटीचा आकडा पार केला आहे. कंपनीने 1 जून2010 मध्ये भारतात पहिल्यांदा गॅलेक्सी मालिकेतील गॅजेट्स सादर केली होती.

सॅमसंग इले.चे उपाध्यक्ष (मोबाइल) असीम वारसी यांनी सांगितले की, सॅमसंग गॅलेक्सी एस, गॅलेक्सी एस-2 व 3, गॅलेक्सी नोट, गॅलेक्सी नोट-2 आणि गॅलेक्सी - वाय या गॅजेट्सने प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. भारतीय बाजारात स्मार्टफोनच्या वापराचा अनुभव पुढे नेण्यात या गॅजेट्सा मोठा वाटा आहे. गॅलेक्सी मालिकेतील उत्पादनांत गॅलेक्सी-वाय (लाँच : ऑक्टोबर 2011), गॅलेक्सी एस-2 (लाँच : मे 2011), गॅलेक्सी टॅब (लाँच : नोव्हेंबर 2011), गॅलेक्सी टॅब टू -310 (लाँच : मे 2012) आणि गॅलेक्सी एस- 3 या गॅजेट्सचा समावेश आहे. कंपनीने विविध गॅजेट्सच्या स्वतंत्र विक्रीची आकडेवारी जाहीर केलेली नाही. मात्र गॅलेक्सी वाय मालिका, नोट मलिका आणि एस-3 या उपकरणांचा एकूण विक्रीत 50 टक्क्यांपेक्षा अधिक वाटा असल्याचे कंपनीने म्हटले आहे.


1 कोटी गॅलेक्सी मोबाइलची विक्री 1 कोटी गॅलेक्सी मोबाइलची विक्री Reviewed by Sooraj Bagal on January 28, 2013 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.