प्रादेशिक भाषांतील ई-बुक

टेक्नोलॉजीच्या जमान्यात वाचन लेखन आणि इतर अनेक बाबींमधील तंत्रेच बदलली टेक्नोक्रांती झाल्यामुळे काम करण्याच्या पद्धतीतही अनेक बदल झाले प्रत्यक्षात आता कुणीही कागदावर हाताने फारसे लिहित नाही त्याची गरजच उरलेली नाही पुस्तकांच्या बाबतीत ही छापील पुस्तकाची जागा ई बुक घेऊ लागले आहे 

दिल्लीमध्ये सुरू असलेल्या जागतिक पुस्तक मेळाव्यातही ई बुक ची दखल घेतली गेली एक वेगळा विभाग 'ई बुक च्या प्रकाशकांसाठी निर्मात्यांसाठी ठेवण्यात आला होता कम्प्युटर इंटरनेटबरोबरच स्मार्टफोनवर एका क्लिकवर माहिती उपलब्ध झाली सुरुवातीला इंग्रजी भाषेपुरतेच मर्यादित असणारे हे क्षेत्र आता जवळपास सर्व भाषांमध्ये विस्तारले आहे स्मार्टफोन आयफोन अन्ड्रॉइड यांसारख्या फोनवर अनेक अॅप्लिकेशन्स आहेत .त्यात आता प्रादेशिक भाषांमधील पुस्तके डाउनलोड करण्याच्या अॅप्लिकेशनची भर पडणार आहे 

टॅबलेट आणि मोबाइलसाठी ई बुक आणि ई मॅगझिन्स पुरवणाऱ्या रॉकस्टँड या कंपनीने दिल्लीतील जागतिक पुस्तक मेळाव्यात प्रादेशिक भाषांमधील पुस्तकांच्या पहिल्या संचाचे अनावरण केले आहे यामुळे प्रादेशिक भाषांमधील ई पुस्तकेही फोनवर वाचता येणार आहेत विविध प्रकाशनांची इंग्रजी पुस्तके ई बुक 'वर उपलब्ध आहेत आता प्रादेशिक भाषांमधील पुस्तकांची मागणी यामुळे वाढणार आहे केवळ प्रिंट कॉपीं 'च्या विक्रीवर होणाऱ्या नफ्याची गणिते आता केव्हाच मागे पडली आहेत . ' अॅन्ड्रॉइड वर एका अॅप्लिकेशनद्वारेही पुस्तके डाउनलोड करता येतील 

रॉक असाप रिटेल प्रायव्हेट लिमिटेड चे संस्थापक संचालक प्रवीण राजपाल यांनी या अॅप्लिकेशनची माहिती दिली ते म्हणाले , ' हिंदी गुजराती मराठी यांसारख्या प्रादेशिक भाषांमधील पुस्तके यामुळे सर्वांना मिळणारआहेत एकूण १८ भाषांमध्ये आम्ही पुस्तके प्रसिद्ध करत आहोत .' यासाठी अॅन्ड्रॉइड फोनवर एक अॅप्लिकेशन डाउनलोड करावे लागेल हे अॅप्लिकेशन मोफत डाउनलोड करता येईल डाउनलोड केलेले पुस्तक कायमस्वरूपी वापरता येईल इंटरनेट अॅक्सेस नसला तरी डाउनलोड केलेले पुस्तक वाचता येणार आहे नाइट रीडिंग मोड ,फॉण्ट साइजमध्ये बदल करणे पुस्तक वाचताना नोट्स काढण्याची सोय यांसारखी वैशिष्ट्ये या अॅप्लिकेशनमध्ये आहेत एवढेच नव्हे तर वाचायचा आपल्याला कंटाळा आला तर वाचून दाखवण्याची सोय या अॅपमध्ये आहे .पुस्तक डाउनलोड करण्याची किंमत ही छापील पुस्तकाच्या किमतीपेक्षा फार कमी आहे सर्वांत स्वस्त पुस्तक हे 'चाचा चौधरी कॉमिक बुक असून पुस्तकाची किंमत केवळ एक रुपया आहे 

कंपनीने नुकतेच देशातील पन्नास प्रकाशकांशी टाय अप केलेले आहे विविध भाषांमधील आणखी एक हजार पुस्तके त्यामुळे कंपनीच्या संग्रहात दाखल झाली आहेत सध्या रॉकस्टँड कडे वीस लाख पुस्तके आहेत आर्थिक फायद्यांबरोबरच वाचनसंस्कृती वाढीला लागावी हा या बदलत्या आणि प्रगतीशील तंत्रज्ञानाचा उद्देश आहे हेसर्वांनी लक्षात घेऊन टेक्नॉलॉजीचा वापर वाचून समृद्ध होण्यासाठी करावा 

प्रादेशिक भाषांतील ई-बुक प्रादेशिक भाषांतील ई-बुक Reviewed by Sooraj Bagal on February 12, 2013 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.