सोशल मीडियामध्ये युर्जसच्या फोटोवरून वादंग माजले आहे. फिल्टर्स आणि कॅमेरा अँप्सच्या मदतीने गेल्या वर्षभरात सोशल नेटवर्किंग वेबसाइट युर्जसना मोठे फोटो आणि प्रोफाइल पिक्चर अपलोड करायला भाग पाडत आहेत. कारण लोकांना फोटो पाहायला आवडते. ज्या वेबसाइटवर जास्तीत जास्त फोटो असतील, तेवढीच ती लोकप्रिय ठरते; पण बुधवारी फेसबुकचे संस्थापक आणि सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी फेसबुकसह इतर कंपन्यांना प्रोफाइल आणि इतर फोटोंमध्ये एवढा रस का आहे, यामागील कारण स्पष्ट केले. झुकरबर्ग यांनी सांगितले की, जेवढे फोटो शेअर केले जातात, तेवढय़ा प्रमाणात जाहिराती मिळतात.
ऑनलाइन जाहिरात कंपन्यांना रंगीत, आकर्षक माध्यमांची गरज असते. त्यामुळे युजर कनेक्ट होतात. फोटोमुळे जाहिरातीचे संतुलन टिकून राहते. जाहिरातीचा फोटो कंटेंट न्यूज फीडसोबत जाऊ शकत नाही. न्यूज फीडवर पॉप अप आल्यावर युर्जस चिडू शकतात. फोटो जेवढा मोठा असतो, तेवढी मोठी जाहिरात मिळू शकते. इन्स्टाग्रामच्या यशाचेही हेच गमक आहे. छोट्या स्क्रीनवर ते मोठी इमेज दाखवतात. झुकरबर्ग सांगतात की, ‘जाहिरातदारांना मोठे फोटो आणि व्हिडिओच हवे असतात.असे फोटो आणि व्हिडिओ आम्हाला युर्जसने केलेल्या पोस्टमधून मिळतात. आमच्या प्रॉडक्ट डिझाइनचे एक तत्त्व आहे. ते म्हणजे- आमचे ऑरगॅनिक कंटेंटसुद्धा पेड कंटेंटप्रमाणेच असावे. आम्ही फोटोला प्राधान्य देण्याचे कारणही साहजिक आहे. टेक्स्ट किंवा व्हिडिओच्या तुलनेत फोटो सहजपणे पाहता येतात. एका सर्वेक्षणानुसार, फेसबुकवरील फोटोसोबत असलेल्या पोस्ट सामान्य पोस्टच्या तुलनेत 39 टक्के जास्त युर्जसना आकर्षित करतात.’ BHuffingtonpost.com

फेसबुकला आपले फोटो का हवे असतात ?
Reviewed by Sooraj Bagal
on
February 07, 2013
Rating:
No comments: