अल्ट्राबुक आणि टॅब्लेटहीविंडोज ८ ही ऑपरेटिंग सिस्टिमची नवीन अद्ययावत आवृत्ती मायक्रोसॉफ्टने बाजारात आणली त्यावेळेस अल्ट्राबुक्स बाजारात आणणाऱ्या अनेक कंपन्यांसोबत त्यांनी सहकार्य करार केले. गेल्या काही महिन्यांमध्ये खास करून वर्षभरात अल्ट्राबुक्स हा प्रकार लोकप्रिय झाला आहे. अर्थातत्याची अधिक असलेली किंमत हा सध्या तरी मोठा अडथळा आहे. दुसरीकडे टॅब्लेट हा प्रकार वेगात लोकप्रिय होतो आहे. हे लक्षात घेऊनच या कंपन्यांनी अल्ट्राबुक कम टॅब्लेट ही संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे. महत्त्वाचे म्हणजे या संकल्पनेला बाजारापेठेने, ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. या मांदिआळीमध्ये आता लिनोवोनेही हवा तेव्हा टॅब्लेट आणि हवा तेव्हा अल्ट्राबुकसारखा वापर करता येणारा पीसी बाजारात आणला आहे.लिनोवो आयडिआपॅड योगा ११ असे या मॉडेलचे नाव आहे. खरे तर याच्या योगा या नावातच सारे काही आहे. योगा म्हणजे लवचिकतेसाठी केला जाणारा व्यायामप्रकार. यामध्येही तेच अपेक्षित आहे. याचा स्क्रीन चक्क ३६० अंशात फिरवला की, मग की बोर्ड खालच्या बाजूस जातो आणि त्याचा टॅब्लेट होतो. हा भारतातील पहिला पीसी आहे ज्याच्यासाठी िवडोज ८ च्या क्षमतेच्या असलेल्या विंडोज आरटीचा वापर ऑपरेटिंग सिस्टिम म्हणून करण्यात आला आहे. इन्स्टंट रेझ्युम तंत्रज्ञानाच्या वापरामुळे स्लीप मोडमध्ये असलेला हा पीसी अवघ्या १० सेकंदात सुरू होतो, हे याचे महत्त्वाचे वैशिष्टय़ आहे. शिवाय यात मायक्रोसॉफ्ट ऑफिस होम आणि स्टुडंट्स २०१३ आरटी प्रीव्ह्य़ू यात प्रीलोडेड स्वरूपात देण्यात आले आहे. हार्डवेअर- सॉफ्टवेअर : ११.६ इंचाचा टचस्क्रीन (१३६६ ७ ७६८ पिक्सेल्स ), १.४ गिगाहर्टझ् एनव्हीडीआ टेग्रा थ्री क्वाड कोअर प्रोसेसर, २ जीबी डीडीआर थ्री रॅम, ६४ जीबी एसएसडी, टू इन वन कार्ड रीडर, ७२० पी एचडी वेबकॅम, इंटिग्रेटेड स्टिरिओ स्पीकर्स, इंटर्नल मायक्रोफोन, वाय- फाय, ब्लूटूथ, २ गुणिले यूएसबी २.०, एचडीएमआय, कॉम्बो जॅक, १.२७ किलोग्रॅम्स, तब्बल १३ तास चालणारी बॅटरी (कंपनीचा दावा) आणि विंडोज आरटीभारतीय बाजारपेठेतील किंमत : रु. ६१,७९०/-
Tech इट
Tech इट
लिनोवो आयडिया पॅड योगा ११ अल्ट्राबुक आणि टॅब्लेटही
Reviewed by Sooraj Bagal
on
March 30, 2013
Rating:
No comments: