माणसाच्या इंटरनेटसोबतच्या नात्याची वीण दिवसेंदिवस घट्ट होऊ लागली आहे . इंटरनेट सुरू झाल्यापासूनचा प्रवास सर्वांनाच परिचित आहे . कम्प्युटरवर केबलच्या माध्यमातून चालणाऱ्या इंटरनेटने केव्हाच कात टाकली आणि वायरलेस कम्युनिकेशनने जोर पकडला . त्यातही आता मोठ्याप्रमाणावर प्रगती झाली आहे .
' वाय - फाय ' मुळे इंटरनेट वेगवेगळ्या संवादसाधनांवर वापरता येऊलागले . लॅपटॉप , हँडसेटवरही इंटरनेट सुरू झाले आणि मग स्पर्धा सुरू झाली , ती इंटरनेटच्यावेगाची . या वेगाच्या सूत्राला अनुसरून मग पहिल्या पिढीचे ( फर्स्ट जनरेशन ), दुसऱ्या पिढीचे (सेकंड जनरेशन ) तंत्रज्ञान बाजारात आले . पहिल्यापेक्षा दुसरे अधिक फास्ट असे हे सूत्र . वेग वाढवण्यातही मोठी स्पर्धा चालू असून अधिकाधिक वेग कसा वाढवता येईल , याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .
' सॅमसंग ' ने याबाबतीत मोठी झेप घेतली असून अतिजलद पाचव्या पिढीच्या ( ५जी ) वायरलेस तंत्रज्ञानाची चाचणी घेतली आहे . ' सॅमसंग ' च्या नव्या तंत्रज्ञानामुळे इंटरनेट आणि मोबाइल क्षेत्रात क्रांती घडणार आहे . यामुळे एखादा मोठा चित्रपटसुद्धा एका सेकंदात डाऊनलोड करता येईल . दोन किमीच्या अंतरामध्ये सेकंदाला एक गिगाबाइट एवढा डेटा डाउनलोड करण्याची चाचणी यशस्वी झाल्याचे दक्षिण कोरियाच्या या कंपनीने सांगितले आहे . हे तंत्रज्ञान त्वरित बाजारात उपलब्ध होणार नाही . त्यासाठी आणखी किमान पाच ते सहा वर्षे प्रतीक्षा करावी लागेल . २०२० पर्यंत हे तंत्रज्ञान बाजारात येईल . तोपर्यंत कंपनी ' ट्रान्समीटिंग स्पीड ' उपलब्ध करणार आहे . सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या चौथ्या पिढीच्या ( ४जी ) तंत्रज्ञानापेक्षा याचा वेग शंभर पटीने अधिक असेल , असा दावा कंपनीने केला आहे . अनेक ' हेवी फाइल्स ' फारसा त्रास न घेता मूव्ह करता येणार आहे .
या तंत्रज्ञानामुळे ३डी चित्रपट , गेम्स , अल्ट्रा हाय डेफिनिशन कंटेन्ट ( यूएचडी ) या सेवांचा वापर यूजर विनासायास करू शकतील . मिलिमीटर वेव्हबँडचा वापर करून घेण्याचे तंत्रज्ञानही कंपनीकडे आहे . त्याचा फायदा मोबाइल इंडस्ट्रीला होईल . ' सॅमसंग ' तर्फे घेण्यात आलेल्या चाचणीत ' ६४अँटेना एलिमेंट ' चा वापर करण्यात आला . यामुळे लांब अंतरावरून येणाऱ्या ' डेटा ' ला अडथळा झाला नाही . जगामध्ये सर्वाधिक वायर नेटवर्क असलेल्या दक्षिण कोरियासारख्या देशात आत्ताच ४जीतंत्रज्ञान वापरणारे दोन कोटी लोक आहेत .
ज्या मानवी मेंदूतून पाचव्या पिढीपर्यंतच्या ( ५जी ) तंत्रज्ञानाचा शोध लागत आहे आणि इतर अनेक क्षेत्रांत बुद्धीच्या बळावर मानव आकाशाला गवसणी घालत आहे , त्या या मेंदूच्या ' स्पीड ' चाउपयोग प्रत्यक्षात करण्यात आला , तर ती जागतिक क्रांती ठरेल . अर्थात त्यासाठी आणखी कितीपिढ्यांचे ( ४जी , ५जी , ६जी , ७जी ...) तंत्रज्ञान बाजारात येईल , कोण जाणे !

इंटरनेटची पाचवी पिढी - 5G Network invented by Samsung Korea
Reviewed by Sooraj Bagal
on
May 21, 2013
Rating:

My family every time say that I am wasting my time here at web, however I know I
ReplyDeleteam getting knowledge all the time by reading such fastidious posts.
I every time spent my half an hour to read this webpage's posts
ReplyDeletedaily along with a cup of coffee.
Hello, yes this post is in fact good and I have learned lot of things from it concerning blogging.
ReplyDeletethanks.
If you desire to grow your experience simply keep
ReplyDeletevisiting this web page and be updated with the latest gossip posted
here.