बीबीएम- ब्लॅकबेरी मेसेजिंग अॅपल आणि अँड्रॉइडवरही!

                    आतापर्यंत ब्लॅकबेरीची ऑपरेटिंग सिस्टिम बीबीएम यांसारख्या सुविधांचा अनुभव फक्त ब्लॅकबेरीधारकांनाच घेता येत होता त्या जोरावर ब्लॅकबेरीने कित्येक वर्षे वर्चस्व गाजवले पण आता अॅपल आणि अँड्रॉइड वापरणाऱ्यांनाही बीबीएमचा मोफत लाभ घेता येणार आहे त्यामुळे व्हॉट्सअॅप किंवा आयमेसेज सारख्या सेवांचा वापर कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे असे असले तरी या क्रॉस फंक्शनालिटीमुळे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नवे पर्व सुरू होणार आहे हे मात्र निश्चित 


                        सध्या जगभरातील सहा कोटी नागरिक बीबीएमने जोडले गेले आहेत दररोज सुमारे १० अब्ज मेसेज या माध्यमातून पाठविले जातात या १० अब्ज मेसेजपैकी जवळपास निम्मे मेसेज पाठविल्यानंतर २० सेकंदांच्या आत वाचले जातात ब्लॅकबेरीच्या मेसेंजरची हीच गतिमानता त्यांची यूएसपी ठरली आहे आता अॅपल आयओएस आणि अँड्रॉइड युजर्सनाही काही दिवसांतच याचा मोफत लाभ घेता येणार आहे 

त्यामुळे बीबीएम चॅटच्या माध्यमातून मेसेजची तत्काळ देवाणघेवाण करणे एकाचवेळी अनेक व्यक्तींशी चॅट करणे व्हॉइस नोट शेअरिंग यासारख्या गोष्टी सहज शक्य होणार आहेतत्याचबरोबर ब्लॅकबेरी ग्रुप स्थापन करून बीबीएम युजर्स कॅलेंडर फोटो फाइल्स आणि इतर गोष्टी एकाच वेळी ३० व्यक्तींशी शेअर करू शकतील सध्या आयओएस ६ आणि अँड्रॉइड ४ ० (आइसक्रीम सँडविच किंवा त्यापेक्षा प्रगत ऑपरेटिंग सिस्टीम वापरणाऱ्यांना बीबीएमचा लाभ घेतायेणार आहे 
                         व्हॉट्सअॅप निंबुझ आयमेसेज यासारख्या मेसेजिंग सुविधा गेल्या काही वर्षांत जवळपास सर्वस्मार्टफोनवर उपलब्ध होत्या मात्र बीबीएम केवळ ब्लॅकबेरी युजर्ससाठीच उपलब्ध असल्याने त्यावरकाही मर्यादा येत होत्या त्यामुळे अनेक दिवसांपासून ब्लॅकबेरी अॅपल आणि अँड्रॉइड युजर्सना बीबीएमसारखी काहीतरी सुविधा उपलब्ध करून देईल अशी चर्चा होती 

आता बीबीएमच्या माध्यमातून अँड्रॉइड आणि अॅपल युजर्ससाठी ती प्रत्यक्षात आली आहे पण तरी विंडोज आणि सिंबियनधारकांचे काय हे मात्र ब्लॅकबेरीने अजून जाहीर केलेले नाही त्यामुळे या युजर्सचे काय ,या प्रश्नाचे उत्तर मात्र अनिश्चित आहे तरी खूप मोठ्या संख्येने असलेल्या अॅपल 
आणि अँड्रॉइडयुजर्सची मात्र सोय झाली आहे बीबीएमनंतर वर्षाअखेर त्यांच्यासाठी व्हॉइस व्हीडिओ चॅट आणि बीबीएम चॅनलची सुविधा देण्याचीही योजना ब्लॅकबेरीने बनवली आहे आता फक्त गुगल आणि अॅपलने कुठल्याही आडकाठीशिवाय त्यांच्या अॅपस्टोअरवर हे अॅप उपलब्ध करून द्यावे म्हणजे बीबीएमच्या चाहत्यांच्या मार्गातील सर्व अडथळे दूर होतील .


बीबीएम- ब्लॅकबेरी मेसेजिंग अॅपल आणि अँड्रॉइडवरही!  बीबीएम- ब्लॅकबेरी मेसेजिंग अॅपल आणि अँड्रॉइडवरही! Reviewed by Sooraj Bagal on May 22, 2013 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.