दक्षिण कोरीयाच्या सॅमसंग कंपनीने खास भारतीय ग्राहकांसाठी लॉन्च केलेला हा फोन नोकियाच्या आशा सीरीज आणि मायक्रोमॅक्स तसेच कार्बनसारख्या भरतीय कंपन्यांच्या मोबाईलशी स्पर्धा करण्यासाठी बाजारात आणला आहे. या आधी सर्वात स्वस्त असणारा सॅमसंग गॅलॅक्सी व्हाय हा फोन ५ हजार ८९० रुपयांना होता. मात्र हा नवीन स्टार फोन त्यापेक्षाही कमी किंमतीत ग्राहकांना देण्याचा आम्ही प्रयत्न केल्याचे कंपनीने आपल्या म्हटले आहे. सायबर मिडीया रिसर्चच्या एका अहवालानुसार २०१२ मध्ये भारतात २२ कोटी १० लाख स्मार्टफोन विकले गेले आहेत. त्यामुळे या बाजारात आपला शेअर वाढवण्यासाठी सॅमसंगने ही शक्कल लढवल्याचे बोलले जात आहे.
फोन स्पेसीफीकेशन्स
-ड्यूएल सिम स्लॉट.
-अन्ड्रॉइड ४.१ जेली बिन ऑपरेटिंग सिस्टीम
-५१२ एमबी रॅम
-४ जीबी इन बिल्ट, ३२ जीबी क्षमता
-३ इंचाची स्क्रीन, २ मेगा पिक्सल कॅमेरा
-४.० ब्ल्यू टूथ
-१२०० एमएएच क्षमतेची बॅटरी
सॅमसंग अन्ड्रॉइड स्मार्टफोन ५२४० रुपयात!
Reviewed by Sooraj Bagal
on
May 30, 2013
Rating:

No comments: