आणि अॅपलने कॅलेंडर इमोजीमध्ये १७ जुलै निवडली आहे कारण iCal अॅपल मॅक कम्प्युटरवर १७ जुलै २००२ पासून उपलब्ध करून देण्यात आलं होतं!

तुम्हाला ठाऊक आहे का इमोजीची सुरुवात १९९८ च्या आसपास जपानी फोन्समध्ये करण्यात आली होती!१९९५ च्या आसपास पेजर्स वापरले जायचे त्यावेळी जपानच्या NTT डोकोमोने एक इमोजी वापरली आणि ती प्रचंड लोकप्रिय झाली. काही काळ :) स्मायलीसुद्धा प्रसिद्ध झाल्या होत्या. हळूहळू इमोजीच आज सर्वत्र पाहायला मिळते. फेसबुकवर ❤️ गेल्यावर्षीपेक्षा यावर्षी दुपटीने वापरली गेली आहे! एकूण २८०० हुन अधिक इमोजीपैकी जवळपास सर्वच म्हणजे २३०० रोजच्या रोज वापरल्या जात आहेत! ७० कोटी इमोजी फेसबुक च्या पोस्ट्समध्ये दैनंदिन वापरल्या जात आहेत! नववर्षाच्या स्वागताला सर्वाधिक इमोजीचा वापर होतो. भारतात फेसबुकवर केकची 🎂 ही इमोजी सर्वाधिक वापरली जाते.
यावर्षीच्या इमोजी डे निमित्ताने अॅपलने आणखी नव्या इमोजी जाहीर केल्या आहेत. लेखामध्ये सुरूवातीला असलेल्या इमेजमध्ये दिसणार्या डाव्या उजव्या बाजूच्या इमोजीचा नव्याने समावेश केला जात आहे..!
search terms world emoji day marathi
आज आहे जागतिक इमोजी दिवस! : वर्ल्ड इमोजी डे निमित्त थोडी माहिती
Reviewed by Sooraj Bagal
on
July 17, 2018
Rating:
Reviewed by Sooraj Bagal
on
July 17, 2018
Rating:


No comments: