एअरटेलच्या काही निवडक पोस्टपेड आणि प्रीपेड ग्राहकांना आता मोफत अॅमॅझॉन प्राईम मेंबरशिप, एअरटेल टीव्ही, Wynk म्युझिक, Airtel Secure, मोफत अतिरिक्त कनेक्शन, रिचार्जवर कॅशबॅक अशा सुविधा मिळणार आहेत. Airtel Thanks प्रोग्रॅम अंतर्गत या सुविधा दिल्या जातील. रिलायन्स जिओद्वारे देण्यात येणाऱ्या जिओ सिनेमा, जिओ म्युझिक, जिओ टीव्ही या सेवा पाहता एयरटेलकडून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी हा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. रिचार्ज प्लॅन किंवा पोस्टपेड बिल पाहून ठरावीक ग्राहकांनाच एयरटेलकडून या सुविधा मिळणार आहेत.
अॅमॅझॉन प्राईम मेंबरशिप ही एका वर्षासाठी मोफत असेल, त्यानंतर एअरटेलकडून दर वर्षी ९९९ शुल्क आपोआपच वसूल केले जाईल. याअंतर्गत ग्राहकांना अॅमॅझॉन प्राईम व्हिडिओवरील कॉन्टेन्ट पाहता येणार आहे त्याबरोबरच लवकर ऑर्डर डिलिव्हरीसारख्या सुविधा मिळतील. आपणास नको असल्यास सदस्यता रद्दसुद्धा करता येईल. Airtel Secure द्वारे स्मार्टफोनसाठी Accidental /Liquid डॅमेज प्रोटेक्शनसोबतच अँटी व्हायरस आणि क्लाऊड बॅकअप सुविधा मिळणार आहेत. तसेच मेंबर्सना प्रीमियम कस्टमर सपोर्ट उपलब्ध करून दिला जाईल जेणेकरून प्रतिनिधींशी तत्काळ संपर्क साधता येईल.
My Airtel App किंवा वेबसाइटवर लॉगिन केल्यानंतर थँक्स पेज वरून आपण या सुविधांचा लाभ घेऊ शकता तसेच आपणास सुविधा उपलब्ध नसतील तर थँक्स बॅनरवर क्लिक करून याचा भाग होण्यासाठी अधिक माहिती मिळवता येईल.
अधिक माहितीसाठी - https://www.airtel.in/airtel-thanks/faq

व्हिडिओ - Airtel Secureकसे जॉईन कराल?
My Airtel App किंवा वेबसाइटवर लॉगिन केल्यानंतर थँक्स पेज वरून आपण या सुविधांचा लाभ घेऊ शकता तसेच आपणास सुविधा उपलब्ध नसतील तर थँक्स बॅनरवर क्लिक करून याचा भाग होण्यासाठी अधिक माहिती मिळवता येईल.
अधिक माहितीसाठी - https://www.airtel.in/airtel-thanks/faq
एयरटेल थॅंक्स सादर! : आता एयरटेलचा सदस्यता प्लॅन
Reviewed by Swapnil Bhoite
on
August 27, 2018
Rating:
Reviewed by Swapnil Bhoite
on
August 27, 2018
Rating:

No comments: