PUBG Mobile चे २० कोटी डाऊनलोड्स : ३ कोटी प्लेयर्स रोज खेळत आहेत ही गेम!


सध्या प्रचंड लोकप्रिय असलेल्या पब्जी मोबाइल गेमने २० कोटी डाउनलोडसचा टप्पा ओलांडला असून आता तब्बल ३ कोटी ऍक्टिव्ह प्लेयर्स ही गेम रोज खेळत आहेत! टेनसेंटतर्फे ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे!  भारतातही प्रचंड लोकप्रिय असलेली ही गेम इतकी गाजत आहे कि मोबाईल फोन विक्रेते "ह्या फोनमध्ये पब्जी चांगलं चालतंय" असे सांगत विक्री करत आहेत!

नुकताच PUBG Mobile ने फोर्टनाईटला iOS वर कमाईमध्ये मागे टाकलं आहे. सध्या कॉम्पुटर व कॉन्सोलवर फोर्टनाईट आणि फोन्सवर पब्जी मोबाईल हे तुफान गाजत असल्याचं चित्र आहे. बॅटल रोयाल प्रकारच्या या गेम्सची लोकप्रियता सध्या उच्चांकी पातळीवर आहे! भारतात गेमिंग पीसी किंवा कॉन्सोल तितके लोकप्रिय नसल्यामुळे अँड्रॉइडवरच बऱ्याच जणांनी प्राथमिकता दिली आहे आणि PUBG Mobile नेमकं यातच यशस्वी ठरलं आहे! मध्यंतरी तर VIT कॉलेजमध्ये PUBG खेळण्यावर बंदी आणली असल्याचं सांगण्यात येत आहे, विद्यार्थ्यांचं अभ्यासाकडे दुर्लक्ष होत असल्याचं या कॉलेजचं म्हणणं आहे!


यासोबत आजच PUBG Mobile ने त्यांचा नवा विकेंडी मॅपसुद्धा डाउनलोडसाठी उपलब्ध करून दिला आहे. ह्याची साईज 135MB असून हा मॅप आज डाउनलोड करता येत असला तरी या मॅपमध्ये खेळण्यासाठी उद्यापर्यंत वाट पाहावी लागेल. या मॅपसोबत बऱ्याच नव्या गोष्टी जोडल्या जात असून याचा आनंद घेण्यासाठी प्लेयर्सना आणखी काही तास वाट पाहावी लागेल...!

अपडेट : आता हा मॅप खेळण्यासाठी उपलब्ध झाला आहे...! 

  
PUBG Mobile चे २० कोटी डाऊनलोड्स : ३ कोटी प्लेयर्स रोज खेळत आहेत ही गेम! PUBG Mobile चे २० कोटी डाऊनलोड्स : ३ कोटी प्लेयर्स रोज खेळत आहेत ही गेम! Reviewed by Sooraj Bagal on December 20, 2018 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.