नोव्हेंबरमध्ये भारतात पोहचेल गूगल टॅब ( स्वस्त + फीचर्सनी युक्त )


नोव्हेंबरमध्ये भारतात पोहचेल गूगल टॅबनोव्हेंबरमध्ये भारतात पोहचेल गूगल टॅब
गूगलचा नेक्सस- 7 टॅब्लेट नोव्हेंबर महिन्यात भारतीय बाजारात दाखल होणार आहे, अशी माहिती टॅब्लेट निर्माता कंपनी असूसने दिली आहे. नेक्सस-7 ची किंमत अद्याप कळलेली नाही. गूगल नेक्सस येत्या 7 ऑक्टोबरला भारतात येणार होता. परंतु काही कारणास्तव त्याला येण्यास विलंब होत असल्याचे कंपनीच्या सूत्रांनी सांगितले. फ्रान्स, जर्मनी, स्पेनमध्ये नेक्सस-7 ची प्री- ऑर्डर सुरू झाली आहे.

नोव्हेंबरमध्ये भारतात पोहचेल गूगल टॅब
नेक्सस - 7 हे वास्तविक गूगल प्रोडक्ट आहे. असूस या कंपनीशी गूगलने करार केला आहे. नेक्सस-7मध्ये NVIDIA Tegra 3 प्रोसेसर बस‍विण्यात आले आहे. गूगल नेक्सस- 7 मध्ये 8 तसेच 16GB इंटरनल स्टोरेज ऑप्शन मिळणार आहे. 1 GB रॅम असेल. 1.2 MP च्या कॅमेरा सोबत वाय-फाय कनेक्टिविटी असेल. 7 इंचाचा स्क्रीन असून 1280-800 चे रिझॉल्यूशन असेल. गूगल नेक्सस- 7 हा 4.1 एंड्रॉयड जेलीबीन ऑपरेटिंग सिस्टमवर काम करते.
गूगल नेक्सस- 7 सोबत आपल्याला गूगलच्या अनेक अ‍ॅप्स मिळणार आहे. या टॅब्लेटमध्ये Game आहेत.गूगल नेक्सस- 7 मध्ये 3 G कनेक्टिवटी नसणार आहे. परंतु असूसने 3G नेक्सस- 7 चे प्रयत्न सुरू  केले आहेत. लवकरच तोही सादर होईल.    




नोव्हेंबरमध्ये भारतात पोहचेल गूगल टॅब ( स्वस्त + फीचर्सनी युक्त ) नोव्हेंबरमध्ये भारतात पोहचेल गूगल टॅब ( स्वस्त + फीचर्सनी युक्त ) Reviewed by Sooraj Bagal on September 20, 2012 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.